पुणे

कमवाकवस्तीत ३४ किलो गांजा जप्त

CD

उरुळी कांचन, ता. १६ : लोणी काळभोर परिसरातील कदमवाकवस्ती येथे गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने मोठी कारवाई करत ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा आणि मोटारीसह १४ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून फरार तिघांचा शोध सुरू आहे.
अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१, रा. नवीन म्हाडा कॉलनी, हडपसर) आणि विशाल दत्तात्रेय जाधव (वय २८, रा. हिंगणे मळा, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १४) गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलिस निरीक्षक संदीपान पवार आणि त्यांचे पथक लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी कदमवाकवस्ती येथील कृपासिंधू ईस्ट सोसायटीसमोर संशयास्पद ''ओरा'' मोटार (एमएच १२ व्हीटी २०००) अडवून तपासणी केली असता, त्यात ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी गांजा, कार आणि भ्रमणध्वनी असा एकूण १४ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संदीपान पवार, उपनिरीक्षक अभिजित पवार, वैभव मगदुम, पोलिस अंमलदार नासिर देशमुख, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, शशिकांत नाळे, सुभाष आव्हाड, किशोर दुसिंग, वैभव रणपिसे, उमाकांत स्वामी, स्वाती तुपे, अमर चव्हाण, शहाजी काळे, राहुल ढमढेरे अविनाश इंगळे यांच्या पथकाने केली आहे.

अक्षय होता वर्षभरापासून फरार
अक्षय पाडुळे हा मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT