थेऊर, ता.२३ : इंस्टाग्रामवर ओळख वाढवून सुरवातीला मैत्री केली. मैत्री झाल्यानंतर महागडा मोबाईल पाठवण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची तब्बल ११ लाख ५१ हजार ९०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलोनी बापू अरवडे (वय २६,रा.कवडीपाठ टोलनाका, ता. हवेली) या शिक्षण पूर्ण करून संगणक प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान, पाच डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवर विकास शर्मा नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. सुरुवातीला साध्या गप्पांमधून ओळख वाढवत त्याने विश्वास संपादन केला. काही दिवसांनी त्याने स्वतःला यूकेमध्ये रेस्टॉरंट व्यवसाय करणारा भारतीय असल्याचे सांगितले आणि मैत्रीच्या नावाखाली तरुणीला ‘आयफोन १७ प्रो मॅक्स’ भेट देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पार्सल पाठवले असल्याचा बहाणा करत मुंबई विमानतळ कस्टम अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडून तरुणीला फोन आला. कस्टम शुल्क, एक्स्चेंज फी, परमिशन लेटर, इन्कम टॅक्स, कॅश शो मनी अशा वेगवेगळ्या कारणांनी त्या तरुणीला वारंवार पैसे भरण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर स्वतःला सीबीआय अधिकारी आणि आरबीआयचा व्यवस्थापक असल्याचे सांगत आरोपींनी तिच्या करिअरचा नाश करण्याची व कुटुंबावर कारवाई करण्याची धमकी दिली. या भीतीमुळे तरुणीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आणि युपीआय आयडीवर पैसे पाठवले.
दरम्यान, आरोपींनी सलोनी बापू अरवडे यांच्याकडून एकूण ११ लाख ५१ हजार ९०० रुपये उकळले. नंतर संशय आल्यावर तिने पैसे परत मागितले असता आरोपींनी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.