उरुळी कांचन, ता. ३१ : पूर्व हवेलीतील सोरतापवाडी येथे अनधिकृतपणे माती मिश्रित वाळू धुणाऱ्या दोन केंद्रांवर महसूल विभागाने धडक कारवाई केली. या प्रकरणी संबंधित जागामालकांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अप्पर लोणी काळभोर कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार,अतिरिक्त तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सोरतापवाडी येथील कारवाईत वाळू धुण्यासाठी बांधलेला रॅम्प, शिल्लक माती आणि पाण्याचे साठे पथकाला आढळून आले.
या कारवाईत तहसीलदार तृप्ती कोलते यांच्यासह मंडलाधिकारी किशोर जाधव (थेऊर), ग्राम महसूल अधिकारी मयूर शेवाळे (कुंजीरवाडी), अर्जुन स्वामी (कोलवडी) आणि कोतवाल भंडलकर यांनी सहभाग घेतला. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कडक मोहीम राबवली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.