पुणे

सासरच्या जाचाविरुद्ध महिला पोलिसाची तक्रार

CD

उरुळी कांचन, ता. २७: पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अंमलदाराला सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक जाचाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका शिवकुमार खबाले (वय २५, रा. शिंदवणे, ता. हवेली) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती शिवकुमार श्यामराव खबाले, सासू शोभा, सासरे श्यामराव, नणंद लक्ष्मी, दीर अमर आणि मंगेश खबाले (सर्व रा. कळंब, जि. धाराशिव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका यांचा विवाह डिसेंबर २०२१ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही काळानंतर आजारपणात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रियंका यांनी पोलिस भरतीची तयारी सुरू केली असता, पतीने दारू पिऊन त्यांना अडथळा निर्माण केला व भरती झाल्यास नांदवणार नाही, अशी धमकी दिली. मे २०२३ मध्ये त्या पोलिस दलात भरती झाल्या. मात्र, त्यानंतरही त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्यात आली.
डिसेंबर २०२५ मध्ये त्यांना घराबाहेर काढण्यात आले. सध्या त्या शिंदवणे येथे भाडेत्त्वावर राहत असून, तिथेही पतीने येऊन मारहाण व शिवीगाळ केली. अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक गौरी क्षीरसागर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT