पुणे

विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेत चैतन्य विद्यालय प्रथम

CD

ओतूर, ता. १३ : ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोणी काळभोर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.
याविषयी विद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख बी. आर. खाडे म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, माईर्स एमआयटी इंग्लिश मीडियम स्कूल लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात चैतन्य विद्यालयातील इयत्ता नववीमध्ये शिकत असलेला श्रीकृष्ण राजेंद्र फलके आणि इयत्ता दहावी मधील आयुष विकास वीर या दोघांनी विज्ञान प्रदर्शनात जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने त्यांची निवड जिल्हास्तरावर झाली होती. लोणी काळभोर पुणे येथे जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली. यामध्ये एकूण १५ संघ सहभागी झाले होते. या त्यामधून त्यांनी प्रथम क्रमांक पटकविला आणि आता त्यांची राज्यस्तरावर होणाऱ्या प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे ज्येष्ठ शिक्षक एम. एम. तांबे, भगवंता घोडे, प्रमोद जाधव, अनिल जवरे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, उपाध्यक्ष प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, खजिनदार रघुनाथ तांबे, सचिव प्रदीप गाढवे, सहसचिव पंकज घोलप, डॉ. राजेंद्र फलके, डॉ. सविता फलके यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT