पुणे

बेकायदा गौणखनिज उत्खनन मढ पट्ट्यात जोमात

CD

ओतूर, ता. ८ ः जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील मढ-तळेरान खोऱ्यातील गाव व वाड्यावस्त्यांमधून अवैधरीत्या गौणखनिज माती, मुरूमाची वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत आहे, असो आरोप नागरिकांमध्ये होत आहे.

डिंगोरे गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर बुधवारी रात्रीच्या वेळेस अवैध माती वाहतूक करणाऱ्या ट्रक व मोटारीचा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, या अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे हा अपघात झाला. मढ खोऱ्यातील तळेरान, सितेवाडी व इतर परिसरात तसेच खिरेश्वर व डोंगर भागांतून ही माती काढून अवैद्यरित्या नियम धाब्यावर बसवून उत्खनन केले जाते. जुन्नर तालुक्याचा हा पिंपळगाव- जोगा धरण परिसर व माळशेज पट्ट्या ईकोझोनमध्ये असून त्याठिकाणीउत्खनन करण्यास बंदी आहे. तरीही या परिसरात जेसीबी यंत्राच्या साहाय्याने उत्खनन सर्रास सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील डोंगर, टेकड्या, जंगले, झाडे-झुडपे, नामशेष होऊ लागले आहेत.

कारवाई करण्याची मागणी
या अवैद्य वाहतुकीमुळे रस्त्याची वाट लागली आहे. यातून उडणारी माती व धुळीने इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी महसुल विभागाने त्वरित या अवैध माती वाहतुकीला व उत्खननाला जबर बसवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


माती वाहतूक माळशेज घाटामधून ही होत आहे. तसेच तालुक्यात काही भागात गौणखनिज उत्खनन व वाहतुकीस नियमानुसार शासकीय परवानगी दिलेली आहे. जुन्नर तालुक्यातील मढ खोऱ्यात व इतरत्र सुरू असलेल्या अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तैनात करून कारवाई करणार आहे.
- रवींद्र सबनीस, तहसीलदार (ता.जुन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT