पुणे

ओतूर बाजारामध्ये कांद्याच्या २२ हजार पिशव्यांची आवक

CD

ओतूर, ता.१५ : ओतूर (ता.जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात रविवारी (ता.१५) कांद्याच्या २२ हजार ९३१ पिशवीची आवक झाली. उच्चप्रतीच्या कांद्यास प्रतिकिलोला ५३ ते ५५ रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
ओतूर उपबाजारात गुरुवार व रविवारी असे आठवड्यातून दोन दिवस कांदा लिलाव केले जातात.मागील बाजाराच्या तुलनेत ओतूर उपबाजारात या बाजारी चार हजार कांदा पिशवीची आवक घटली असून, बाजारभाव मात्र उच्चप्रतीच्या कांद्याला किलोला दहा ते अकरा रुपयाची वाढ झाली आहे.
ओतूर उपबाजारात गोळा कांद्यास ४७० ते ५३१, सुपर कांदा ४२० ते ४९०, गोल्टी कांदा ३०० ते ४२०, बदला कांदा १५० ते ३५० रुपये असा बाजारभाव मिळाला. तर मागील बाजारी गुरुवारी (ता.१२) एकूण २६९३० कांदा पिशवी आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोला गोळा कांदा ४२० ते ४४०, सुपर कांदा ३८० ते ४३०, गोल्टी/ गोल्टा २९० ते ३५०, बदला कांदा २०० ते ३०० असा बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

Wath A Ball! पृथ्वी शॉचा संघर्ष सुरूच... डोळ्यासमोर चेंडू फिरला अन् यष्टिंवर आदळला, हा पठ्ठ्या नुसता पाहत राहिला Video Viral

रितेश देशमुखवर चक्क उधारी! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...'मला त्याची उधारी चुकवायची, प्लीज मदत करा'

Sagar Mali Bodybuilder Death : जगाला ताकद दाखवली पण..., आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सागर माळी यांचे निधन, मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT