पुणे

पवारवाडीमध्ये जलवाहिनीत आढळला सडलेला सरडा

CD

उद्धट, ता. २५ : पवारवाडीतील (ता. इंदापूर) पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीत शनिवारी (ता.२५) सडलेल्या अवस्थेतील सरडा आढळून आला. यामुळे ग्रामस्थांत भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्यातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तपासणीदरम्यान जलवाहिनीत मृत सरडा आढळून आला. याच दूषित पाण्याचा वापर नागरिक करत असल्याने कॉलरा, गॅस्ट्रो यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. मात्र, तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. टाक्यांची स्वच्छता, जलवाहिनीची तपासणी आणि नोंदी केवळ कागदोपत्रीच राहतात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाणीपट्टी वसुलीत तत्पर असणारे प्रशासन स्वच्छतेत का कुचराई करते, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीतील पाण्याच्या टाक्या झाकलेल्या असतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उघड्या टाकीतून किंवा स्वच्छतेनंतरच्या जलवाहिनीमधून सरडा आत गेला असावा, असे ग्रामसेवक शैलजा आटोळे यांनी सांगितले.

दरम्यान, सडलेल्या अवस्थेतील सरडा सापडणे, या गंभीर प्रकाराची वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पवारवाडीतील या घटनेबाबत संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

यात्रा तोंडावर आली असताना अशा घटना धक्कादायक आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. वर्षभरापूर्वीही येथे मृत खार आढळली होती. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करीत आहेत.
- बापूराव खरात, सामाजिक कार्यकर्ते

00749

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT