पुणे

थेऊर फाटा येथे ७०० किलो गोमांस जप्त

CD

उरुळी कांचन, ता. १५ : पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा (ता. हवेली) येथे रविवारी (ता. १५) बेकायदेशीररीत्या गोमांस वाहतूक करणाऱ्या सुमो वाहनास राजगुरुनगर (ता. खेड) येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले. मात्र, वाहनचालक फरारी झाला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, ७०० किलो गोमांस वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गावडे, कृष्णा चौधरी, ओंकार जाधव, कुणाल इंटक, निखिल ठिगळे, कल्पेश गाडे, तेजस भानुसे हे सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते असून, ते पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील रहिवासी आहेत. हे सर्व जण पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर येथे देवदर्शनाला आले होते. परतीच्या प्रवासात ते थेऊर फाटा येथे अंदाजे सकाळी ७ वाजता होते. त्यावेळी त्यांना पुढे चाललेल्या वाहनातून महामार्गावर रक्त सांडताना दिसून आले. त्यांना या वाहनात गोमांस असल्याची शंका आली. त्यानुसार त्यांनी वाहनाला ओव्हरटेक करून अडविले. मात्र, त्यावेळी या वाहनाचा चालक फरारी झाला. त्यांना वाहनामध्ये गोमांस आढळून आले. त्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी या प्रकरणी सदर वाहन जप्त करून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT