पुणे

बेबी कालव्यात मोटार कोसळून एकाचा मृत्यू

CD

उरुळी कांचन, ता. २३ : शिंदवणे (ता. हवेली) येथील लोखंडी कठड्याला मोटार धडकून गुरुवारी (ता. २३) सकाळी सहाच्या सुमारास थेट बेबी कालव्यात पडली. या अपघातात अमर साहेबराव घाडगे (वय २८, रा. जुन्नर) याचा मृत्यू झाला तर आदित्य महादेव तावरे (वय २०, रा. जुन्नर) व गणेश संजय थोरात (वय २२), शुभम शंकर इंगोले (वय २१ रा. दोघेही, केसनंद, वाघोली, ता. हवेली) हे तिघे जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम, गणेश, अमर तसेच आदित्य हे चौघेजण बकऱ्या विकण्याचा व्यवसाय करतात. ते चारचाकी घेऊन गुरुवारी फलटण येथील बाजारात बकरी खरेदीसाठी निघाले होते. त्यापैकी अमर मोटार चालवीत होता. त्याच्याशेजारी पुढे एक जण आणि दोघे मागे बसले होते. सकाळी सहाच्या सुमारास शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील बेबी कालव्याजवळून जात असताना अमरचे मोटारीवरील नियंत्रण सुटले व मोटार थेट लोखंडी कठडा तोडून पाण्यात कोसळली. यावेळी स्थानिक नागरिक बाळा महाडीक, वैभव कदम आणि त्यांचे सहकारी यांनी कालव्यात उड्या मारून चौघांना बाहेर काढले. नागरिकांनी अमर याला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
दरम्यान, कालव्यावरील पुलाची मर्यादा संपली असून, हा पूल लवकरात लवकर नवीन बांधावा. अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच गणेश महाडीक यांनी दिला आहे.

02048

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT