पुणे

उरुळी येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

उरुळी कांचन, ता. २७ : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात झालेल्या अपघातामध्ये‌ दुचाकीस्वाराचा मृत्यू तर दुसऱ्या एका अपघातामध्ये भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पादचारी जखमी झाला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी वाहनचालक व दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पहिली घटना भवरापूर येथील गोळीबार मैदानाजवळ घडली. मच्छिंद्र नारायण काळे (वय ५७, अष्टापूर फळीवस्ती, ता. हवेली) हे रविवारी (ता.२५) दुपारी साडेबारा वाजता बाजार आणण्यासाठी घरातून मोटर सायकलवर उरुळी कांचनला गेले. ते रविवारी घरी आले नाहीत. त्यानंतर गावातील एकाने सोमवारी (ता. २६) सकाळी साडेसात वाजता मच्छिंद्र काळे यांचा मुलगा लक्ष्मण काळे (वय २९) याला फोन करून ‘तुमच्या वडिलांचा भवरापूर येथे गोळीबार मैदानाजवळ अपघात झाला आहे’ असे सांगितले. लक्ष्मण व त्याचा भाऊ अतिश काळे तत्काळ भवरापूर येथील गोळीबार मैदानाजवळ गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना वडील मच्छिंद्र काळे मृतावस्थेत पडल्याचे व त्यांची दुचाकी बाजूला पडल्याचे दिसले.
दुसरी घटना उरुळी कांचन येथे घडली. दत्तात्रेय गेनबा तुपे (वय ६१, रा. सूर्यमुखी गणेश मंदिराजवळ, तुपेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) हे सोमवारी (ता. २६) सायंकाळी उरुळी येथील वाघाडे हॉस्पिटल जवळून पायी जात होते. यावेळी हिरो (ग्लॅमर टी.एस. ०१/ इजे २७३८) या भरधाव दुचाकीने दत्तात्रेय तुपे यांना जोरदार धडक दिली. यामध्ये तुपे गंभीर जखमी झाले. त्यामुळे तुपे यांचा पुतण्या किरण संजय तुपे (वय ३२) यांनी दुचाकीस्वाराविरोधात उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT