उरुळी कांचन, ता. १९ : रामदरा (ता. हवेली) डोंगराच्या पायथ्याशी ओढ्यालगत अवैधपणे चालणाऱ्या हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून तो उद्ध्वस्त करत गावठी दारूसह ११ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच पळून गेलेल्या हातभट्टीचालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बाजूला असलेल्या हातभट्टी दारू भट्टीवर छापा टाकून ११ लाख ६० हजार रुपये किमतीची तयार हातभट्टी दारू, रसायन, तसेच हातभट्टी तयार करण्याकरिता लागणारे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश करमावत, (वय ५, रा. गणेशनगर, नवरत्न गोडवानजवळ, मंतरवाडी, फुरसुंगी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या हातभट्टीचालकाचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत राबविलेल्या कोंबिग ऑपरेशनदरम्यान पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रामदरा डोंगराच्या पायथ्याशी ओढ्यालगत अवैधपणे गावठी दारूची हातभट्टी चालवली जाते. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तयार हातभट्टी दारू, रसायन, तसेच हातभट्टी तयार करण्याकरिता लागणारे साहित्य, असा एकूण ११ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागल्याने हातभट्टीचालक मुकेश करमावत पळून गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.