पुणे

लोणी येथे तरुणाकडून २२२ ग्रॅम गांजा जप्त

CD

उरुळी कांचन, ता. १७ : लोणी काळभोर (ता. हवेली) रेल्वे स्थानक परिसरातील फोर अव्हेन्यू सोसायटीच्या मागे जयहिंद नगर येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या सोहेल युसुफ पठाण (वय १९, रा. जयहिंद नगर, लोणी स्टेशन) या तरुणावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडील ४ हजार ६६२ रुपये किमतीचा २२२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पठाण हा बुधवारी (ता. १४) दुपारी तीनच्या सुमारास लोणी काळभोर रेल्वे स्थानक परिसरातील फोर अव्हेन्यू सोसायटीच्या मागे जयहिंद नगर येथे बेकायदेशीररीत्या गांजा विक्रीसाठी थांबला होता. त्यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांना त्याच्या हालचाली संशयितरीत्या असल्याचे जाणवले. त्याची झडती घेतली असता ११० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील गांजा जप्त केला व त्याला ताब्यात घेतले.
आरोपी पठाण याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गांजा सद्दाम अन्वर शेख (रा. जयहिंद नगर, लोणी स्टेशन) याच्याकडून विक्रीसाठी घेतला असल्याची कबुली पोलिसांना दिली. शेख याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एका कॅरीबॅगमध्ये ११२ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलिस हवालदार ज्योती नवले, पोलिस शिपाई यादव, गाडे, संदीप धुमाळ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे आरएसएसशी मतभेद? संघाचे माजी पदाधिकारी राम माधव म्हणाले, 'दोन्ही संघटना एकाच विचारसरणीच्या, पण...'

'हा कुत्रा खाऊन आलाय का, सारखा भूंकतोय!' इरफान पठाणने केली शाहिद आफ्रिदीची बोलती बंद; मग पुढे काय, झाला ना राडा...

Whatsapp Call Schedule : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं कॉल शेड्यूल फीचर, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Maharashtra News Updates : चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी पावसामुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान

Pune : पुण्यात मद्यधुंद चालकानं डीसीपींच्या गाडीला दिली धडक, मुलगी जखमी; दोघांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT