पुणे

वरोडीच्या उपसरपंचपदी संदेश वरे बिनविरोध

CD

उत्रौली, ता. २० : वरोडी खुर्द (ता. भोर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदेश नारायण वरे यांची शुक्रवारी (ता. २०) बिनविरोध निवड करण्यात आली.
वरोडी खुर्दचे उपसरपंच रोहिदास वरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदाकरिता निवडणूक घेण्यात आली. सरपंच शीतल संदीप भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. संदेश वरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसेवक शामबाला मुळे यांनी निवडणूक सहायक अधिकारी म्हणून काम पाहिले. सरपंच शीतल भिलारे यांच्या हस्ते उपसरपंच संदेश वरे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच शीतल भिलारे, संदेश वरे, रोहिदास वरे, सागर वरे, सुरेखा वरे, मेघा वरे आदी सदस्य उपस्थित होते. सर्वांना विचारात घेऊन गावची विकास कामे करणार असल्याचे नूतन उपसरपंच संदेश वरे यांनी सांगितले. या प्रसंगी भगवान वरे, माजी संरपंच एकनाथ वरे, माजी सरपंच आनंदा वरे, सर्जेराव वरे, धर्मु वरे, कृष्णा वरे, शिवाजी वरे, काळूराम वरे, श्‍यामराव वरे, संदीप भिलारे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT