उत्रौली, ता. २५ : आंबाडे (ता. भोर) येथील प्रा. स्नेहा शिवाजी खोपडे यांनी वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद यांच्या वतीने डिसेंबर २०२५मध्ये घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत ९९.१३ पर्सेंटाइल मिळवित रसायनशास्त्र विषयात ५५वी आॅल इंडिया रँक प्राप्त केली आहे. त्यांना पीएचडी करिता त्यांना कनिष्ठ संशोधन स्कॉलरशिप मिळाली आहे.
अभ्यासक्रमाचे सखोल आकलन, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, संदर्भ पुस्तकांचा वापर, प्रश्नपत्रिकांचा सराव, स्वतःच्या नोटस, योग्य मार्गदर्शन तसेच कठोर परिश्रमाच्या जोरावर खोपडे यांनी यश संपादन केले.
वडील सेवानिवृत्त विस्ताराधिकारी शिवाजी खोपडे, आई रुक्मिणी खोपडे, पती प्रताप गाढवे, कन्या विरा, सासूबाई मिरा गाढवे, सासरे रमेश गाढवे यांची मिळालेली भक्कम पाठबळ यामुळे सेट आणि नेट परीक्षेत यश मिळाल्याचे स्नेहा खोपडे यांनी सांगितले. त्यांचे प्राथमिक शिक्षण आंबाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालय आणि पदवीचं शिक्षण अनंतराव थोपटे महाविद्यालय तसेच पदव्युत्तर शिक्षण पुणे येथील आबेदा इनामदार सिनिअर काॅलेजमध्ये पूर्ण केले. भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा २०२४ मध्ये उत्तीर्ण झाल्या.
माजी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे, उपाध्यक्ष पृथ्वीराज थोपटे, प्राचार्य संजय नेवसे, विभागप्रमुख डॉ. धनंजय बोरकर, डॉ. कविता मुंढे, डॉ. श्रीकांत निकम, आकाश दांडेकर, अमित वेणुपूरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.