पाटस, ता.१ः पाटस-दौंड रस्त्यावर गारफाटा हद्दीतील एका पेट्रोल पंपात दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने आलेल्या दोघांनी पंपातील कर्मचाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. त्याकडील पैशाची चोरी केली. मात्र, प्रसंगावधान राखून एका पंप कर्मचाऱ्याने चोरांच्या दुचाकीची चावीकाडून घेतल्याने चोरट्यांची भंबेरी उडाली. त्यानंतर पोलिसांनी शेतात पळून गेलेल्या चोरांना पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर शिताफिने पकडले. शनिवारी (ता.३०) रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी अनिकेत दादासाहेब ढोपे (रा शेळगाव ता.इंदापूर), धनंजय नारायण हाघारे (रा.इंदापूर) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. याबाबत पाटस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी माहिती दिली. गार फाटा येथे रस्त्यालगत सिद्धिविनायक पेट्रोल पंप आहे.त्याठिकाणी शनिवारी रात्री दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात व्यक्ती आले.दुचाकीत पेट्रोल भरल्या नंतर दुचाकीवरील एकाने बॅगेतील कोयता काढून खुर्चीवर बसलेल्या पंप कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला.त्यानंतर दोन्ही चोरट्यांनी त्याच्याकडील पैशाची चोरी केली. अंधाराचा फायदा घेत बाजूच्या शेतात पलायन केले.
याबाबत माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, उपनिरीक्षक संजय नागरगोजे तसेच पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर हे पोलिस पथकासह घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी शोध माहीम सुरु केली. शेवटी पहाटे चार वाजता अथक प्रयत्नानंतर गिरीम हद्दीत दोन्ही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांची तपासणी केली असता कोयता, बनावट बंदूक आढळून आली.
रविवारी (ता.१) न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली,अशी माहिती पोलिस अधिकारी नागरगोजे यांनी दिली.
00157
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.