पुणे

वडगाव निंबाळकर येथे २२० जणांचे रक्तदान

CD

वडगाव निंबाळकर, ता. २५ : शिवजयंतीतिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात तब्बल २२० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
येथील बाजार तळावरील प्राथमिक उपकेंद्र इमारतीसमोर शिबिर पार पडले. प्रारंभी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शिबिरास सुरुवात झाली. शिबिरात परिसरातील तब्बल ४५ तरुण मंडळांतील युवकांनी सक्रिय सहभाग घेतला. गावातील उमा निंबाळकर, वैष्णवी अचपळ, अंकिता गायकवाड, वैशाली जाधव, ज्ञानेश्वरी लोणकर, विजया निंबाळकर, राणी साळवे, संगीता दरेकर आदी महिलांनी, तसेच काही अपंग व्यक्तींनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम ढोले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक शिवाजी राजेनिंबाळकर, सुनील भगत, अविनाश शिंदे, अनिलकुमार शहा, नीलेश अगम, राहुल दरेकर, सरपंच सुनील ढोले, प्रेमलता रांगोळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT