पुणे

बारामती आरटीओकडून नवीन रिक्षा परवाना बंद

CD

वडगाव निंबाळकर, ता. १८ ः बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बारामती, दौंड आणि इंदापूर या तीनही तालुक्यांमध्ये नव्या रिक्षा (प्रवासी) परवान्यांच्या वितरणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत तीनही तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे निरीक्षण नोंदवण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत आपला अहवाल शासनाकडे सादर केला होता. अहवालानुसार, या तीनही तालुक्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या रिक्षा परवान्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवीन परवाने देण्याची आवश्यकता सध्या भासत नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.
विशेषतः शहर व उपनगर भागात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीवर ताण निर्माण होत असून, रस्त्यांवर गर्दीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर, वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी आणि रस्त्यांवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन भविष्यात आवश्यकतेनुसार निर्णयात बदलाची माहिती वरिष्ठांना दिली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी सांगितले
दरम्यान, नव्या परवान्यांच्या स्थगितीमुळे इच्छुक चालकांमध्ये नाराजीचे वातावरण असले तरी, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT