पुणे

अजितदादांकडून सहकार चळवळीला मोठी मदत

CD

वडापुरी, ता. ४ : ‘‘राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, अशी अजितदादांची भूमिका होती. त्याचबरोबर अजितदादांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार चळवळीला कायम सहकार्य केले. त्यामुळे अजितदादांच्या जाण्यामुळे सहकार चळवळीचे नुकसान झाले आहे,’’ असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा- भीमा सहकारी साखर कारखान्यावर सोमवारी (ता. २) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत पाटील बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले की, ‘‘अजितदादा व आम्ही राज्य मंत्रीमंडळात सुमारे २० वर्षे बरोबर काम केले आहे. आमचे राजकीय मतभेद त्याकाळी होते. मात्र, वैयक्तिक मैत्री कायम होती. आता अलीकडच्या काळात संघर्ष नको, आपण एकत्र काम करू, अशी अजितदादांनी भूमिका घेतली होती. त्यानुसार आम्ही एकत्र येत काम करण्यास सुरुवात केली.’’
यावेळी लालासाहेब पवार, अंकिता पाटील ठाकरे, ॲड. कृष्णाजी यादव, उमेश पाटील, के. एस. खाडे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी श्रद्धांजली वाहणारी मनोगते व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगीता पोळ आदींसह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT