पुणे

वडापुरी येथील शेळी मालकाला मारहाण

CD

वडापुरी, ता. १२ : वडापुरी (ता. इंदापूर) येथे मध्यरात्री शेळ्या चोरण्यास आलेल्या चोरट्यांनी शेळीमालक वसंत पवार यांना गंभीर मारहाण केली व चार शेळ्या चोरून नेल्या. ही घटना रविवारी (८) रात्री घडली. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चोरीबाबत लक्ष्मी वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री दीडच्या सुमारास कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने पती वसंत पवार हे उठून बाहेर गेले. त्यावेळी त्यांच्या शेळ्यांजवळ तीन अनोळखी चोरटे उभे होते. त्यातील एका चोरट्याने पवार यांना दगड फेकून मारला. तो त्यांच्या डोक्यात लागला. दुसऱ्या एकाने तेथे पडलेली खुंटी ठोकायचा घन पती वसंत पवार यांच्या पाठीत मारला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, यावेळी चोरट्यांनी तीन शेळ्यांसह एक बोकड असा अंदाजे २० हजार रुपयांचा ऐवज चोरी नेला.

दरम्यान, यावेळी घराशेजारील विठ्ठल जाधव यांना वसंत पवार यांनी बोलविले. त्यानंतर पवार यांना सुरवड येथील स्वप्नील घोगरे यांच्या मदतीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेचा तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.
चोरीच्या घटनेने नागरिक धास्तावले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Punishment: छ. संभाजी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा; रबरने केस बांधले अन्...

Pune Couple Friendly Park: जोडीदारासोबत एकांतात क्षण घालवायचे? पुण्यातील हे पार्क आहे बेस्ट!

३ बरगड्या फ्रॅक्चर झाल्या... 'पुन्हा साडे माडे ३'च्या सेटवर अशोक सराफ यांना झालेली दुखापत; निवेदितांनाही सांगितलं नाही कारण

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Zakir Husain Hospital : झाकीर हुसेन रुग्णालयाची दैना! इमारत सुसज्ज, पण सोयी-सुविधांचा मात्र पत्ताच नाही

SCROLL FOR NEXT