वडापुरी, ता. २४ : ‘‘देशात व राज्यात साखर कारखान्यांचे हंगामातील ऊस गाळपाचे दिवस अलीकडच्या काळात कमी होत चालले आहेत. परिणामी गाळपही कमी होत चालल्याने साखर उद्योगांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी उपाययोजना व नियोजन करून साखर कारखान्यांचे हंगामातील उसाचे गाळप वाढविणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे रविवारी (ता. २२) नीरा भीमा कारखाना येथे आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी नीरा भीमा कारखान्याने चालू सन २०२५-२६ च्या हंगामामध्ये ऊस बिलाची रुपये ३१०१ प्रमाणे सर्व रक्कम राज्यात सर्वप्रथम अदा करणारा पहिला कारखाना ठरला. याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पाटील पुढे म्हणाले की, चालू हंगामामध्ये कारखान्याने एकूण ५२५६५७ टन उसाचे गाळप करीत ता.१० फेब्रुवारीला हंगामाची सांगता केली. यामध्ये उसाच्या २६५ वाणाचे प्रमाण ८५ टक्के तर को.८६०३२ वाणाचे प्रमाण अवघे १५ टक्के आहे. या हंगामामध्ये अधिकचे ऊस गाळप होईल असे नियोजन होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले,त्या संदर्भातील कारणे दुरुस्त केली जातील. ऊस तोडणी प्रोग्रॅम काटेकोरपणे राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत कारखान्याकडे उसाच्या नोंदी द्याव्यात.
यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहिली.
कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, डॉ. लक्ष्मण आसबे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील, बाबूराव रणवरे, अनिल पाटील, दत्तू सवासे, दत्तात्रेय शिर्के, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके,आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे सूत्रसंचालन तर ॲड. कृष्णाजी यादव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.