पुणे

घोलपघरच्या सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

CD

वेल्हे, ता. १५ : सोसायटीचे कागदोपत्री रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे व नियमबाह्य कामकाजाचा ठपका ठेवून घोलपघर (ता. वेल्हे) येथील राजेंद्र विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ सहकार विभागाने बरखास्त केले असून, संचालक मंडळास पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यात येणार नसल्याचा आदेश दिला. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच तालुक्यातील दापोडे सोसायटी सहायक निबंधकांनी बरखास्त केली आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राजेंद्र सोसायटीच्या गैरकारभाराबाबत सोसायटीचे सभासद अनिल जगताप व ज्ञानोबा पोळेकर या शेतकऱ्यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत वेल्हे तालुका सहाय्यक निबंधक रूपाली माने व तपासणी अधिकारी पी. एम. तमनर यांनी सोसायटीच्या कामकाजाची तपासणी केली. त्यात संस्थेच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळल्या. संस्थेचे अभिलेख आणि लेखापुस्तके योग्य नमुन्यात ठेवली नसल्याचे तसेच अनियमितता आढळली. त्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले असून, कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केल्याचे सहायक निबंधक रूपाली माने यांनी सांगितले. तसेच, सहायक निबंधक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक पी‌. एम. तमनर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
याबाबत तक्रारदार शेतकरी अनिल जगताप म्हणाले, ‘‘गेल्या दीड वर्षापासून सोसायटीच्या कारभारामध्ये कामकाज नियमबाह्य होत असल्याच्या वारंवार तक्रारी आम्ही करत होतो, यास आज यश आले.’’
राजेंद्र सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानोबा कुंभारकर म्हणाले, ‘‘सदरील कारवाईच चुकीची व अन्यायकारक असून, शेतकरी सभासदांचे म्हणणे जाणून न घेता कोणतीही सूचना न देता राजकीय सूडबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT