वेल्हे, ता. २८ : वेल्हे तालुक्यात सोमवारी (ता.२७ ) पहाटे जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतामध्ये कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे प्रशासनाने पंचनामा करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील अंबवणे, करंजावणे, वांगणी, कोळवडी, मार्गसनी, सोंडे माथना, सोंडे सरपाले, किल्ले राजगड परिसरा मधील वाजेघर मेट पिलावरे लव्ही, आवळी,दादवडी, लाशीरगाव,पाबे, दापोडे वेल्हे, अठरा गाव मावळ परिसर, गुंजवणी धरण परिसर पानशेत परिसर यामध्ये शेतामध्ये कापणी करून ठेवलेल्या भाताचे पीक पाण्यामध्ये तरंगत आहेत तर मोठ्या प्रमाणात जनावरांसाठी लागणाऱ्या पेंढा चाऱ्याचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.
यावर्षी अगोदरच अत्यल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे भात शेतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घसरण होत असतानाच या अवकाळी पावसामुळे त्यात भर घातली आहे.
तालुक्यामध्ये सर्वत्र एकाच वेळी भात काढणी सुरू झाल्याने मजुरांची टंचाई जाणवत होती. त्यामुळे अनेकांनी यंत्राच्या साह्याने शेतामध्येच भात काढणी करून लगेचच तांदूळ करून घेण्याची धावपळ केली होती तर काही शेतकऱ्यांनी शेतामध्येच भात पीक कापून ठेवल्याने या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, असे करंजावणे येथील प्रगतशील शेतकरी आनंद शिंदे यांनी सांगितले.
एक एकर पेक्षा जास्त क्षेत्राचे भात पीक शेतातच कापून ठेवले होते. पहाटे आलेल्या पावसामुळे भाताचे पीक पाण्यावर तरंगत असल्याने उत्पन्नात मोठी घट निर्माण होणार असून याचा तात्काळ पंचनामा करावा.
- मधुकर पोळ, शेतकरी
02161
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.