पुणे

राजगडमधील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

CD

वेल्हे, ता. १४ : राजगड तालुक्यातील पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे बुधवारी (ता. १३) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आयोजित बैठकीमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांनी लक्ष वेधून प्रश्न सोडविण्याची मागणी केल्याची माहिती वेल्हे तालुका भाजपचे अध्यक्ष राजू रेणुसे यांनी दिली.
पानशेत, वरसगाव धरण भागातील जलसंपदा विभागाच्या जागेत असणारी घरे अधिकृत व्हावीत व सदर जागा ग्रामविकास विभागाकडे वर्ग करावी, तसेच वांगणी खोरे, वाजेघर खोरे, शिवगंगा खोरे या भागातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू करण्यासाठी या पाणीपुरवठा योजनांबाबत सुधारित अंदाजपत्रक सादर करून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, तर गुंजवणी धरण पुनर्वसन संपादित जागेसाठी पुनर्वसन म्हणून पुरंदर येथे गायरान जमिनी जागा मिळण्याबाबत या आयोजित बैठकीमध्ये माजी आमदार थोपटे यांनी मागणी केली.
या संदर्भात विखे पाटील यांनी ग्रामविकास मंत्री गोरे व पुनर्वसन मंत्री पाटील यांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती रेणुसे यांनी दिली. यावेळी भाजपचे राज्य सदस्य बाळासाहेब गरुड, अमित कंधारे, वैशाली सणस, भाजपचे तालुकाध्यक्ष राजू रेणुसे, गुंजवणी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, संदीप नगीने, नाना राऊत, चंद्रकांत गायकवाड, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, अमोल पडवळ, रमेश मरगळे, राजू कडू, तानाजी चोरगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT