पुणे

पानशेतच्या पाणलोट क्षेत्रात माणगावच्या तरुणाचा मृत्यू

CD

वेल्हे, ता. ६ ः माणगाव (ता. राजगड) पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेलेला एक २७ वर्षीय तरुण पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रघुनाथ मोतीराम जगताप (मूळ रा. बावले, जि. रायगड, सध्या रा. माणगाव, ता. राजगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत रघुनाथ आणि त्याचे वडील मोतीराम जगताप हे दोघे २ मार्च २०२६ रोजी रात्री ८ च्या सुमारास पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असताना अचानक रघुनाथचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. त्यानंतर त्याचे वडील, वेल्हे पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू होता.
सलग दोन दिवस शोध घेऊनही रघुनाथचा पत्ता लागला नव्हता. अखेर आज ५ मार्च २०२६ रोजी सकाळी शोध घेत असताना माणगाव गावच्या हद्दीत रघुनाथचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्याला तातडीने बाहेर काढून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मोतीराम जगताप यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT