पुणे

राजगडावर सांस्कृतिक महोत्सवासाठी २० लाखांचा निधी

CD

वेल्हे, ता. ६ ः छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राहिलेल्या व युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनात निवड झालेल्या किल्ले राजगडवर (ता. राजगड) आता भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या महोत्सवासाठी २० लाख रुपयांच्या निधीला वित्तीय मान्यता बुधवारी (ता. ४) दिली आहे.
शिवभक्त आणि राजगड तालुक्यातील नागरिकांनी राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. वेल्हे तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन शासनाने नुकतेच याचे राजगड असे नामकरण केले आहे. त्यातच किल्ले राजगडाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनात झाल्याने या तालुक्याचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण या महोत्सवाच्या निमित्ताने केले जाईल. या महोत्सवात पारंपरिक लोककला, पोवाडे, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून शिवकालीन संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आणि संस्कृती तरुण पिढीला जवळून अनुभवता यावी, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.
या महोत्सवासाठी आमदार शंकर मांडेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाचा पाठपुरावा केला होता. निधी मंजूर झाल्याबद्दल मांडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले आहेत.
हा खर्च सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या ‘राज्य कला संस्कृती जतन व संवर्धन’ या लेखाशीर्षाखाली करण्यात येणार आहे.
याबाबत आमदार शंकर मांडेकर म्हणाले, ‘‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळेच वेल्ह्याचे राजगड नामांतरण झाले असून, अजित दादांच्या मुळेच या पाठपुराव्याला यश आले आहे. इतिहासात पहिल्यांदाच राजगड सांस्कृतिक महोत्सव भरणार असून, पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. राजगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT