वेल्हे, ता.३० : भालवडी (ता.राजगड) येथे शेतात अतिक्रमण करत झाडे व कंपाउंडसह सिमेंटच्या खांबाचे व तारा तोडून नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांवर वेल्हे पोलिसांनी सोमवारी (ता.३०) गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वेल्ह्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.
भालवडी येथील मनोहर लक्ष्मण बांदल व नंदा मनोहर बांदल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रंजना लोकमित्र गुडी (रा. येरवडा, पुणे )यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत प्रभारी अधिकारी शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोघे अधिक तपास करीत आहेत.