पुणे

मानकरवाडीच्या उपसरपंचपदी भाजपच्या कोमल थोरात

CD

वालचंदनगर, ता. ७ ः मानकरवाडी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या कोमल धर्मेश थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका गेल्या महिन्यामध्ये झाल्या आहेत. मानकरवाडी ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत पॅनेलने झेंडा फडकवला असून ७ पैकी ५ जागा मिळवल्या होत्या. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी कारभार सुरु केला आहे. उपसरपंच पदाची निवडणूक विद्यमान सरंपच महादेव शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंच पदासाठी कोमल धर्मेश थोरात यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तानाजी घोळवे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मोरे, सागर कणसे, अश्विनी सचिन यादव, पंकज यादव, रेखा शंकर गायकवाड व गौरी राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी भाजपचे पुणे जिल्हा सचिव तानाजी थोरात, सुनील चव्हाण, सुनील मोरे, संभाजी कणसे, संजीवन मोरे, दिलीप कणसे, हरिदास यादव, दशरथ मोरे, दीपक मोरे, अनिल तुपे, प्रशांत मानकर, विलास कणसे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

Thane News: नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा, ७० नव्या बसची घोषणा कागदावरच; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT