पुणे

शिवरायांची वैशिष्ट्ये आचरणात आणा

CD

वालचंदनगर, ता. २० ''''छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष, शूरवीर, दानशूर तसेच न्यायी राजे होते. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वाचन करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनमोल वैशिष्ट्ये जाणून घेऊन ती आचरणात आणावीत,'''' असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.
लासुर्णे (ता.इंदापूर) येथे शिव फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी भरणे यांनी सांगितले की, छत्रपतींचे संघटन कौशल्य, सामाजिक सलोखा, दूरदृष्टीसारखे अनेक पैलू महाराजांचे घेण्यासारखे आहेत. यावेळी भरणे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी लासुर्णेचे सरपंच सागर पाटील, हेमंत पाटील, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, डॉ.योगेश पाटील, विजय निंबाळकर, निखिल भोसले, संतोष लोंढे, डॉ. महादेव मोहिते, अरुण कदम, सुनील थोरात, सुहास भोसले उपस्थित होते.

दरम्यान, शिवजंयतीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन केले होते. यावेळी दीडशेहून अधिक जंगी कुस्त्या झाल्या. कुस्ती मैदानासाठी पहिलवान वस्ताद रणजित निंबाळकर, पहिलवान सुरेश निंबाळकर, पहिलवान तुषार लोंढे, पहिलवान सुनील थोरात, पहिलवान साजन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्या पार पडल्या.


शिवजयंतीच्या कार्यक्रमस्थळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप,नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनीही भेट छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती हेमंत नरुटे, गजानन वाकसे उपस्थित होते.

02976

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT