पुणे

नीरा नदीत अडकलेल्या दोघांना वाचविण्यात यश

CD

वालचंदनगर, ता. २५ : जांब (ता. इंदापूर) येथे नीरा नदीच्या पात्रामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या दोघांना वाचविण्यामध्ये वालचंदनगर पोलिस व प्रशासनाला यश आले.
इंदापूर, बारामतीसह फलटण तालुक्यामध्ये सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रविवारी (ता. २५) अचानक नीरा नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाली. अचानक पूर परिस्थिती निर्माण झाली. जांबमध्ये बंधाऱ्याच्या दुरुस्ती काम सुरु होते. त्यासाठी दोन कामगार नदीमध्ये गेले होते. पुराच्या पाण्यामध्ये दोघेजण अडकले. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, अमोल चितकोटे यांच्यासह पोलिस कर्मचारी तातडीने नदीकाठी पोचले. शर्थीचे प्रयत्न करून दोघांना वाचविण्यामध्ये यश आले.

तावशीमध्ये एकाला वाचविण्यासाठी प्रयत्न
तावशी येथे नीरा नदीमधून एक व्यक्ती वाहून आला होता. तो तावशी बंधाऱ्याजवळ एका झाडाला अडकला होता. त्याला पुराच्या पाण्यातून वाचविण्यासाठी वालचंदनगर पोलिस व प्रशासनाची धावपळ सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

Kolhapur Accident : गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान व दोन गायींचा मृत्यू

Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT