पुणे

लकी ड्रॉने होणार ऊस लागवडीची नोंद

CD

वालचंदनगर, ता.२२ भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस लागणीच्या नोंदीच्या धोरणामध्ये बदल केला असून एक जुलै व १६ जुलै रोजी लागवड केलेल्या उसाची नोंद लकी ड्रॉ (सोडत) पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२०२६ चे ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. १ जुलै २०२५ पासून ऊस लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लागण नोंद देण्यासाठी सभासदांची नेहमीच गर्दी होते. सभासदांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच गर्दी कमी करण्यासाठी चालू वर्षीपासून ऊस लागवड घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय संचालक मंडळाने नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे.
ऊस लागण नोंद घेण्याच्या नवीन पद्धतीनुसार एक जुलै रोजी को-एम ०२६५ व १६ जुलै रोजी को- ८६०३२ व पी. डी.एन. १५०१२ या जातीच्या उसाची लागवड नोंदणी अर्ज त्या दिवशी सकाळी सात ते १० वाजेपर्यंत गाव व विभागानूसार घेण्यात येणार आहेत. तसेच त्याच ठिकाणी सकाळी ११ वाजता लागण नोंदणी फॉर्मची सोडत काढण्यात येणार असून, सोडतीप्रमाणे उसाची तोडणी होणार आहे. तसेच एक जुलै रोजी को- ०२६५ या ऊस जातीचे नोंद दिलेल्या ऊस क्षेत्राची लागवड तीन जुलैपर्यंत व १६ जुलै रोजी को- ८६०३२ व पी.डी. एन. १५०१२ या ऊस जातीचे नोंददिलेल्या ऊस क्षेत्राची लागवड १८ जुलै पर्यंतच्या मुदतीतच पूर्ण करावी लागणार आहे. मुदतीत उसाची लागवड पूर्ण झाली नसल्यास प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आल्यानंतर सदरची नोंद रद्द करण्यात येणार आहे.

कायम केलेल्या उसक्षेत्राची यादी पाच जुलैला लावणार
रद्द केलेल्या व लागवड होऊन कायम केलेल्या ऊस क्षेत्राची सभासदनिहाय को- ०२६५ जातीच्या उसाची लागण नोंदीची यादी पाच जुलैला तर को- ८६०३२ या व्हरायटीची व पी.डी. एन. १५०१२ या व्हरायटीची लागण नोंदीची यादी २० जुलै रोजी ग्रामपंचायत व सोसायटी कार्यालयास लावण्यात येणार आहे. एक जुलै व १५ जुलै या दोन लागण तारखा वगळता इतर लागण नोंदी पूर्वप्रमाणेच घेतल्या जाणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT