पुणे

फडतरे नॉलेज सिटीमध्ये नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

CD

वालचंदनगर, ता. २५ : कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीमधील बाबासाहेब फडतरे इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये डिग्री अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नव्याने मान्यता दिली असल्याची माहिती फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी दिली.
कळंबमध्ये ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी उद्योजक उत्तम फडतरे यांनी शैक्षणिक संकुल सुरू केले आहे. येथे इंग्लिश मीडियम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्निक महाविद्यालय, एमबीए महाविद्यालय, ज्युनिअर कॉलेज, फार्मसी महाविद्यालय, एमसीए, बीसीएचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील मुला-मुलींना याचा फायदा होत असून शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. फडतरे नॉलेज सिटीमध्ये ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित कै. बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मॅकॅनिकल इंजिनिअरिंग या तीन डिग्रीच्या नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयामध्ये असणाऱ्या सोयी-सुविधा, लॅबोरेटरी, लायब्ररी यांची सखोल तपासणी करून ही मान्यता दिली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय फडतरे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य उदय चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT