वालचंदनगर, ता.२ : इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्षाने दिलेल्या जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून २४ तास काम करू, अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश केला.
यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रवीण माने यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीशाली भारत उभा करीत आहेत. त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासामध्ये अग्रेसर आहे. जिल्हा परिषदेचा सभापती असताना ३०० कोटी रुपयांचा विकासनिधी आणून तालुक्याचा विकास केला होता. २०२४ ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढलो असून ३८ हजारापेक्षा जास्त मते मिळाली .तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
05286
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.