पुणे

वालचंदनगरमधील कृषी केंद्राचा परवाना दहा दिवसांसाठी रद्द

CD

वालचंदनगर, ता.२५ : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील मे. बाहुबली शांतीलाल दोभाडा या कृषी सेवा केंद्राने ज्यादा दराने खते विक्री केल्यामुळे कृषी सेवा केंद्राचा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आला.

दोभाडा कृषी सेवा केंद्रातून गेल्या काही दिवसांपासून जास्त दराने खतांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तक्रारीची गुण नियंत्रण निरीक्षक योगेश फडतरे यांनी दखल घेऊन तातडीने कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. यामध्ये खताची ज्यादा दराने विक्री करणे, उपलब्ध खतांच्या साठा फलक न लावणे, भाव फलक न लावणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे कृषी विभागाने तत्काळ आदेश काढत कृषी सेवा केंद्राची निलंबन केले असल्याची माहिती परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी कायद्यातील नियमानुसार खते, बियाणे व कीटकनाशके यांची विक्री करावी. शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देवू नये. कृषी सेवा केंद्राविषयी तक्रारी असल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन गुण नियंत्रण निरीक्षक योगेश फडतरे यांनी केले असून कठोर कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

Nagpur News : नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे होणार परवाने रद्द

Pune Crime : कुख्यात गुंड घायवळला साथ कोणाची? सत्ताधारी-विरोधकांचे एकमेकांवर आरोप

Dilip Walse Patil : मंत्रिमंडळात नसलो तरी पक्षाच्या कोअर कमिटीत आहे; विकासकामांसाठी निधीचा स्रोत कायम

SCROLL FOR NEXT