पुणे

कळंबमध्ये पालखीमधून सवाद्य मिरवणूक

CD

वालचंदनगर ता.१९ कळंब (ता. इंदापूर) येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गुरुवारी (ता. १९) सकाळी शिखर शिंगणापूरहून आणलेल्या शिवज्योतीचे कळंबमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पालखीमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
दुपारी १२ वाजता शिवजन्म उत्सावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांनी शिवरायांचे पाळणे म्हटले. शिवजयंती साजरी करण्यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळाचे जय फडतरे, तानाजी कदम, दीपक चव्हाण, धनंजय वरुडकर, विजय महाडिक, संकेत मोहिते, दादा मोहिते, गणेश चव्हाण, अमेय चव्हाण, महादेव पवार, पाेपट चव्हाण, ऋषिकेश नलवडे, बापू जाधव, ओम चव्हाण यांनी परिश्रम घेतले. शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. २०) लातूरचे शाहीर शाहीर संतोष साळुंके यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाचे, तर शनिवारी (ता. २१) लहान मुलांच्या नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच, रविवारी (ता. २२) होम मिनिस्टर स्पर्धा होणार असून, जास्तीतजास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

05805

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT