पुणे

शेतकऱ्यांच्या खात्यावर २३६ कोटी जमा

CD

वालचंदनगर, ता.११ : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने वजन चोख व पैसे रोख उक्तीप्रमाणे सन २०२५-२६ च्या गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्त्याचे २३६ कोटी ३० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामास एक नोव्हेंबर रोजी सुरवात झाली होती. कारखाना १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद झाला. कारखान्याने १०४ दिवसांमध्ये सात लाख ५६ हजार २८५ टन उसाचे गाळप करून आठ लाख ५९ हजार ४०० क्विंटल साखरेची निर्मिती केली. संचालक मंडळाच्या चोख नियोजनामुळे चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये रिकव्हरीमध्ये वाढ झाली आहे. ११.३६ टक्के उसाची सरासरी रिकव्हरी झाली. सहवीज निर्मिती प्रकल्पातून तीन कोटी ९४ लाख ८८ हजार ३०० युनिट विजेची निर्मिती झाली असून दोन कोटी ५९ लाख ३३ हजार युनिट वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखान्याने सुरवातीपासून गाळप झालेल्या उसाचे पैसे महिन्याच्या १० व २५ तारखेला देण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, अनेकवेळा बॅंकेला सुट्टी असल्यामुळे कारखान्याने मुदतीपेक्षा एक -दोन दिवस अगोदर ही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. १० मार्च राेजी शेवटच्या पंधरवड्यातील १८ कोटी ४० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. आत्तापर्यंत कारखान्याने गळीत हंगामातील २३६ कोटी ३० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याला सभासद,अधिकारी कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर यांनी सहकार्य केल्यामुळे हंगाम यशस्वी झाल्याचे संचालक मंडळाने सांगितले.


ऊस तोडणी वाहतुकीचे बिले जमा..
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील ऊस तोडणी व वाहतुकीचे बिले ही वाहतूकदारांच्या व संबंधित व्यक्तींच्या खात्यावर जमा केली आहेत.


सभासदांनी अनुभवला जाचक पॅटर्न
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा कारभार पृथ्वीराज जाचक व संचालक मंडळाच्या ताब्यात दिला.संचालकमंडळानेही चोख व काटेकोर कारभार केल्यामुळे उसाची रिकव्हरी वाढली. शेतकऱ्यांचा उस वेळेमध्ये गाळप झाला. संचालक मंडळ, कारखान्यातील अधिकारी कर्मचारी, ऊस वाहतूकदार, मुकादम, ऊस तोडणी कामगार यांच्या योग्य नियोजनामुळे सभासदांनी संचालक मंडळावर विश्‍वास ठेवून छत्रपतीला बिनधास्त उस दिला. संचालक मंडळानेही सभासदांच्या विश्‍वासाला तडा जाऊ दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

SCROLL FOR NEXT