पुणे

फुले दांपत्याकडून समाज बदलाचे पहिले पाऊल

CD

वाल्हे, ता. ३ : ''''महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक समतेचा संदेश देत शिक्षण आणि समाजामध्ये आमूलाग्र बदल केले. फुले दांपत्याने महिलांना शिक्षण देऊन समाज व्यवस्था बदलासाठीचे पाहिले पाऊल टाकले. या क्रांतिकारक निर्णयामुळे महिला शिक्षणात आज अग्रेसर आहेत,'''' असे मत महर्षी वाल्मीकी विद्यालयाचे प्राचार्य अब्दुलगफारखान पठाण यांनी व्यक्त केले.
वाल्हे (ता.पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये आज मंगळवार(ता..३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्राचार्य पठाण यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा शाळा व्यवस्थापन समिती व विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर कुदळे, अशोकमहाराज पवार, सुनीता भुजबळ, पूजा सपकाळ, सीमा शिंदे, मधुरा भुजबळ, भावना भुजबळ, अनिमा नदाफ, राहिला इनामदार, ऊर्मिला अधिकारी आदींसह महिला उपस्थित होत्या.

यावेळी महिलांसाठी संगीत खुर्चीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये सोनम संतोष तांदळे यांनी प्रथम, पुष्पा शैलेश पवार यांनी द्वितीय तर पोर्णिमा नानासो तांदळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या महिलांचा विद्यालयाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, बालिकादिनाच्या निमित्ताने ''लेक वाचवा'' नाटिका सादर करण्यात आली. यावेळी सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान केल्या विद्यार्थिनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. विशांत ठाकूर, आम्रपाली गडवे, अतुल गायकवाड, गीतांजली मोरे, सतीश अधिकारी, शैला गवारी, प्रियंका कणेरे, अंकिता ठाकूर आदींनी संयोजन केले. इयत्ता नववीतील विद्यार्थिनी काजल तांबोळी हिने प्रास्ताविक केले. संस्कृती दुर्गाडे, श्रावणी सपकाळ यांनी सूत्रसंचालन तर सिद्धी मदने हिने आभार मानले.

00977

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठ्या मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT