पुणे

सुकलवाडीत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा नारा

CD

वाल्हे, ता. ६ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथे घरासमोर सडा रांगोळी रेखाटत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह युवा सरपंच संदेश पवार यांनी ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ चा नारा देत गावातील लेकींचे औक्षण करून व घराला तिच्या नावाची पाटी लावून स्त्री सन्मानाचा अनोखा उपक्रम राबविला. या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच संदेश पवार यांच्या हस्ते सकाळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन झाले. दरम्यान, सायंकाळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदींनी जिल्हा परिषद प्राथमिक गुणवंत शाळेतील विद्यार्थिनींच्या घराच्या दारावर या मुलींच्या नावाची पाटी मान्यवरांच्या हस्ते लावली. त्यानंतर विद्यार्थिनींचे औक्षणही करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘लेक वाचवा लेक शिकवा’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सरपंच पवार यांनी सांगितले.
आपल्या गावातील लेकींचा असा अनोख्या पद्धतीने केलेला सन्मान पाहून व सरपंचांच्या या अनोख्या उपक्रमाने पालकही भारावून गेले होते. या वेळी योगेश पवार, वैजयंता दाते, शीतल पवार, सुप्रिया पवार, नम्रता पवार, अमृता चव्हाण, शर्मिला पवार, मनोज घाटे, मयूर सुर्वे आदि उपस्थित होते.
यानंतर वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये देखील सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली. या वेळी सरपंच अतुल गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ, संतोष दुर्गाडे, त्रिंबक भुजबळ, सुजित राऊत, महेश पवार आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे यांनी केले. उपसरपंच अमित पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

Sikkim Tourism: सिक्कीममधील गुरुडोंगमार सरोवर पुन्हा खुले, पण नियम मोडल्यास प्रवास रद्द!

Satara News: साताऱ्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची परवड; गॅसटंचाईमुळे खाणावळी बंद, विद्यार्थी गावी परतल्याने अभ्यासिका ओस

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT