वाल्हे, ता. ११ : दौंडज (ता. पुरंदर) येथील पतंगराव कदम विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करत महिला दिन उत्साहात साजरा केला. यानिमित्त स्त्री शक्तीचा जागर करत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. दौंडज (ता. पुरंदर) पतंगराव कदम विद्यालयामध्ये शुक्रवारी (ता. ८) जागतिक महिला दिन साजरा केला. या वेळी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व संस्थेचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमांचे सरपंच सीमा भुजबळ यांच्या हस्ते पूजन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वैभव कनुंजे होते. याप्रसंगी प्रा.किशोरी ताकवले, उपसरपंच अनुजा कदम, कांचन कदम, अमोल कदम, लक्ष्मण दगडे, भगवंत कदम, अर्चना भोसले, नंदा कदम, अलका माने, सुवर्णा गार्डी, मनिषा फरांदे, अनिता कोंढाळकर, विद्या जाधव, नयन शिर्के, शुभांगी जाधव, माया कचरे, शरद जाधव आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना व्याख्यात्या प्रा.किशोरी ताकवले म्हणाल्या की, समाजात महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. महिलांनी स्वत:ला कुठेही कमी लेखू नये व स्वत:च्या करिअरवर भर द्यावा. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मंडल कृषी अधिकारी म्हणून निवड झालेली कांचन भागवत हिने परीक्षा व अभ्यासाबद्दलचे अनुभव कथन केले. या वेळी दौंडजचे माजी सरपंच दामूअण्णा कदम यांच्या वतीने गावातील गरीब, गरजू महिलांचा साडी देऊन सन्मान केला. दरम्यान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, किरण बेदी, अहिल्याबाई होळकर, आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी आदींचा केलेला पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
संध्या राजपुरे यांनी प्रास्ताविक; तर, विलास बिचुकले यांनी सूत्रसंचालन केले. शोभा काळखैरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.