पुणे

वाल्ह्यात बैलांच्या पाठीवर संदेश लिहून वेधले लक्ष

CD

वाल्हे, ता.२ : वाल्हे (ता.पुरंदर) परिसरात शेतकऱ्यांनी संदेशाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गायकवाडवाडी येथील सुहास पवार या तरुण शेतकऱ्याने
गुंजवणीचे पाणी शेतीला मिळाले पाहिजे यासाठी सजावटीतून बैलांच्या पाठीवर ‘गुंजवणीचे धरणाचे पाणी मिळालेच पाहिजे’ तसेच ‘बा सरकारा वाचव माझ्या
धन्याला’ लिहून गुंजवणी धरण लाभक्षेत्रातील सोळा गावांना जुन्या सर्वेनुसार पाणी मिळावे व शेतकरी वाचवावा याबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
बहुतांश शेतकऱ्यांनी सर्जा-राजाची वाजत-गाजत मिरवणुक न काढता घरीच सर्जा-राजाची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केल्याचे सुहास पवार यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, दौंडज, पिंगोरी आदि परिसरामध्ये पारंपारिक पद्धतीने लाडक्या सर्जा-राजाचा
भाद्रपद बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. . शेतकऱ्यांमध्ये उत्साह नसला तरी बहुतांश शेतकऱ्यांनी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवून
बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT