वाल्हे, ता. २४ : टेकवडी (ता. पुरंदर) येथील पत्रावस्ती येथील बंद घराची कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या एक लाख सतरा हजार रुपयांच्या ऐवजासह जवळपास ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी (ता. २३) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी नीलेश संपत इंदलकर यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
ग्रामीण भागात लाखो रुपयांची चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश इंदलकर टेकवडी (ता. पुरंदर) हद्दीतील पत्रावस्ती राहतात. गुरुवारी हे कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शनिवारी (ता. २४) पहाटे घरी आल्यानंतर त्यांना घराची कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. घरात इतरत्र पाहिले असता कपाटातील ३१ ग्रॅम सोन्याचे गंठण, ८ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्यांसह ५० हजार रोख रक्कमेसह एक लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत इंदलकर यांनी फिर्याद दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून जेजुरी पोलिसांनी जेजुरी गुन्हे शोध पथकासह घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. बंद घरामध्ये प्रवेश करून घरातील साहित्य अस्ताव्यस्त करीत सोन्या -चांदीच्या ऐवजासह रोख ५० हजार रुपये असा एक लाख ६७ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला असून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे जेजुरीचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले. पुढील अधिक तपास जेजुरी गुन्हे शोध पथक करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.