वाल्हे, ता.२५: पिंगोरी (ता.पुरंदर) परिसरात गेले काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने परिसरातील जवळपास वीस कोल्हापुरी बंधाऱ्यांसह दहा छोटे-मोठे मातीचे नाले पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
पावसाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत खरीप हंगामासाठी पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पिंगोरीचे सरपंच संदीप यादव यांनी सांगितले. पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि पिंगोरी ग्रामस्थांच्या श्रमदानातून पुनर्जीवित करण्यात आलेला जय गणेश जलाशय अल्प पर्जन्यमान असताना देखील पिंगोरीकरांची तसेच आडाचीवाडी, वाल्ह्याच्या काही वाड्या वस्त्यांची तहान भागवत होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कमी-अधिक जोरदार पावसामुळे येथील वीस कोल्हापुरी बंधाऱ्यांसह दहा लहान-मोठी नाले पूर्ण भरून ओसंडून वाहू लागले आहेत. दमदार पावसामुळे या परिसरातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून येथील जयगणेश जलाशयातील पाणीपातळीमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. परिसरातील विहिरी, बंधारे तुडूंब झाले असून काही ओढे-नाले खळाळू लागले आहेत.
टंचाईच्या काळामध्ये गावातील हा जयगणेश जलाशय आमच्या गावाला वरदान ठरला असून आहे. गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या कमी-अधिक पावसामुळे या जलाशयातील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ होत आहे. पाऊस अजून काही दिवस अशाच पद्धतीने बरसल्यास हा जलाशय पूर्ण क्षमतेने भरून गावचा पाणीप्रश्न मिटून परिसरातील बागायतीसह जिरायती शेतीला देखील मोठा हातभार लागण्यास मदत होणार असल्याचे माजी सरपंच पल्लवी भोसले, माजी उपसरपंच धनंजय शिंदे, माजी पोलिस पाटील राहुल शिंदे, कैलास गायकवाड यांनी सांगितले.
शेवटचा बंधाराही होणार ओव्हरफ्लो
दरम्यान पिंगोरी-कवडेवाडीच्या वरच्या बाजूचे जवळपास सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले असून जास्तीचे पाणी पिंगोरी आडाचीवाडी शिवेलगतच्या बंधाऱ्या येण्यास सुरवात झाली आहे. पावसाचा जोर काही दिवस असाच राहिला तर पिंगोरीतील शेवटचा बंधाराही ओव्हरफ्लो होणार आहे. पाणी आडाचीवाडीमधील बंधाऱ्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे.
...
04588
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.