पुणे

वाल्ह्यात विठू नामाचा गजर

CD

वाल्हे, ता. ६ : आषाढी एकादशीचे औचित्य साधत वाल्हे (ता.पुरंदर) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रविवार (ता. ६) श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली. मंदिरात विठू नामाचा गजरात विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेले होते. निमित्त होते आषाढी एकादशीचे.
आषाढी एकादशीनिमित्त येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुग्धाभिषेक तसेच चंदनाचा लेप लावून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना स्नान घालून सुंदर वस्त्रे, आभूषणे, तुळशीहार आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आले आहे. तसेच मंदिरामध्ये
विद्युत रोषनाईसह फुलांची आकर्षक केलेली सजावट करण्यात आली होती. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीसमोर स्वप्नाली देशपांडे व पियुषा देशपांडे यांनी कल्पतकतेने रेखाटलेली रंगीबेरंगी रांगोळी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. पहाटे सहा वाजता विठ्ठल रुक्मिणी मूर्तींना अभय देशपांडे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजेचा कार्यक्रम झाला. तद्‌नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी आरतीनंतर महिलांनी विठू नामाच्या गजरात पुष्पवृष्टी करत विठ्ठलभक्तांनी पूजाअर्चा केली.
यावेळी माजी सरपंच अमोल खवले, बाळासाहेब भुजबळ, दत्तात्रेय पवार, शिवाजी पवार, कैलास पवार, प्रशांत पवार, रवींद्र दुर्गाडे, उमेश पवार, राजेंद्र पवार, पांडुरंग बनकर उपस्थित होते. दरम्यान, माजी सरपंच अमोल खवले, कैलास पवार यांच्या वतीने भाविकांना उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. अभय देशपांडे, समीर देशपांडे, वसंत देशपांडे, पर्णवी देशपांडे, अनघा देशपांडे, वर्षा देशपांडे, मंजूषा पवार, सीमा पवार आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

04846

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: टीम इंडिया कोणत्या Playing XI सह मैदानावर उतरणार? प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची हिंट...

Pune University : विद्यापीठाच्या आदेशाची अवहेलना; वार्षिक अहवालासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Heart Transplant: विमानसेवेमुळे सोलापूरचे ‘हृदय’ आता ३० मिनिटांत पुण्यात; हृदयाचे ग्रीन कॉरिडॉर शक्य, अवयवदान चळवळीला मिळणार नवा आयाम

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटचा फायदा होणार नाही, संजय लाखे पाटील; जरांगेंचे आंदोलन चुकीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT