पुणे

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून सुकलवाडी परिसरात पाहणी

CD

वाल्हे, ता. ८ : सुकलवाडी (ता.पुरंदर) परिसरात वनविभागाचे क्षेत्र आहे. त्या भागात विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत, अशी
मागणी सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संदेश पवार यांनी वनविभागाकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत वनविभागाचे सासवड
वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी मंगळवारी (ता. ५) सुकलवाडी परिसरात शिवारफेरी करत वनक्षेत्राची पाहणी केली.
यावेळी ढोले यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांसह परिसरातील भोलाई माता मंदिर परिसराचा प्रत्यक्ष भेट देऊन विशेष आढावा घेतला. या मंदिरामध्ये दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असल्याने, मंदिर परिसरात देवस्थान निसर्ग पर्यटन योजना अंतर्गत वृक्षारोपण, पर्यटकांसाठी सोयीसुविधा आणि इतर पर्यावरणपूरक उपक्रम राबण्याबाबतचे निवेदन सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार यांनी वनअधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी माजी उपसरपंच धनंजय पवार, सामाजिक कार्यकर्ते धनंजय परशुराम पवार, सुनील भोसले, अजित पवार, सुभाष पवार, राजेंद्र चव्हाण, केशव पवार, दत्तात्रेय पवार, वनमजूर हनुमंत पवार, किरण पवार, प्रेम दाते, शरद चव्हाण, जयवंत पवार, शुभम चव्हाण आदींसह ग्रामस्थ
उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: कल्याण डोंबिवलीत आगरी कोळी समाजाचा महापौर बसवा, शिंदे गटाच्या आमदारांची मागणी

Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

Building Collapse : वाहनाच्या शोरुमची इमारत कोसळून तीन ठार, तीन गंभीर

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही

Latest Marathi News Updates: गडचिरोलीत आरमोरी येथील शोरूमची इमारत कोसळली, तीन ठार, तीन गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT