वाल्हे, ता. २ : वाल्हे-आडाचीवाडी रस्त्यालगत वाल्हे (ता. पुरंदर) हद्दीतील एका ऊसशेतीला नुकतीच आग लागली होती. या आगीमध्ये एका वन्यप्राण्याचे पिल्लू जळीत अवस्थेत आढळून आले आहे.
वाल्हे-आडाचीवाडी परिसरात ऊसतोडीदरम्यान कामगारांना गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा असून, ऊसशेतीतूनच त्याचा वावर अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी व ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊसशेती ही बिबट्याचे नैसर्गिक आश्रयस्थान असल्याने बिबट्याच्या दहशतीपोटी अज्ञात व्यक्तीने बाळासाहेब भुजबळ व सचिन भुजबळ यांचा ऊस पेटविला असावा, अशी शक्यता भुजबळ कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहितीसमोर आलेली नाही. मंगळवारी (ता. ३०) ऊस तोडणीस अवघा एक महिना बाकी असताना ही घटना घडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गेली आणि काही वेळातच संपूर्ण ऊसशेती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी व ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, वाऱ्याचा वेग आणि आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि अखेर साडेसहा एकर ऊस जळून खाक झाला. आगीच्या वेळी उसामध्ये आश्रयासाठी थांबलेले हे वनप्राणीचे पिल्लू बाहेर पडू न शकल्याने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऊसतोडीदरम्यान कामगारांना हे पिल्लू पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले व वनपाल दीपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर हनुमंत पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृत पिल्लाचा मृतदेह ताब्यात घेतला.
हे वृत्त खरे आहे. प्राथमिक तपासणीत जळीत अवस्थेत आढळलेले पिल्लू हे कोल्ह्याचे आहे.
- सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.