वाल्हे, ता. २४ : नीरा (ता. पुरंदर) येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक इंग्रजकालीन पूल पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या निर्णयाविरोधात नीरा-वाल्हे परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २४) पुलावर एकत्र येत तीव्र निदर्शने केली.
नीरा नदीवर नवा पूल बांधल्यानंतर जुना पूल पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, हा पूल म्हणजे मराठी बांधकामशैलीचा ठेवा आणि पंचक्रोशीतील लोकांची अस्मिता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आंदोलनावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, पृथ्वीराज निगडे, योगेंद्र माने, अनंता शिंदे, अजय राऊत, अजित सोनवणे,प्रकाश कदम, अनिकेत शिंदे, अभिजित जगताप, हरिभाऊ जेधे आदि उपस्थित होते. यावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, पृथ्वीराज निगडे, योगेंद्र माने, अनंता शिंदे, अजय राऊत, अजित सोनवणे,प्रकाश कदम, अनिकेत शिंदे, अभिजित जगताप, हरिभाऊ जेधे आदि उपस्थित होते. वाल्हे येथील रहिवासी सचिन देशपांडे म्हणाले की, "शासन केवळ एक पूल पाडत नाही तर लोकांच्या भावना त्यांचे सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पाडत आहेत.'''' दिवंगत कृष्णाजी मांडके यांचे नातू बाळकृष्ण मांडके म्हणाले की, "पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शिरवळ मार्गे पंढरपूरकडे जात होता. त्या सोहळ्यासाठी सर्वात सोयीचा, जवळचा मार्ग म्हणून वाल्हे (ता.पुरंदर) येथील रहिवासी दिवंगत कृष्णाजी भगवंत मांडके यांनी इंग्रजकाळात नीरा नदीवर पूल बांधला होता. मांडके यांच्या कष्टाने, मदतीने पालखी सोहळ्याचा मार्ग पुरंदर तालुक्यातून सातारा जिल्ह्याकडे तयार झाला. या पुलामुळेच नीरा व वाल्हेकरांनी पालखी सोहळ्यादरम्यान विविध प्रकारचे मान मिळाले आहेत. या पुलाची योग्य दुरुस्ती करून तो पुन्हा वापरात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ निवेदन देणार आहोत.''''
हा जुना पूल शंभरी पार केलेला आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. १०० वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जात आहे. त्यामुळे या पुलाची महती केवळ वाहतुकीतूनच नाही, तर सांस्कृतिक परंपरेतूनही आहे. पुलाच्या शेजारी एक शंभर वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल आहे ज्याची दुरुस्ती रेल्वे प्रशासनाने केली आहे. तसेच नीरा पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
-तेजश्री काकडे, सरपंच
नीरा येथील जुना पूल केवळ एक दळणवळणाचे साधन नाही तर तो वारसा आहे. आम्ही प्रशासनाकडे आग्रह करत आहोत की या पुलाची सुरक्षा सुनिश्चित करून तो पुन्हा वापरायोग्य बनवावा. या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. जर प्रशासनाने याबाबत सकारात्मक पाऊल टाकले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- राजेश काकडे, उपसरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.