पुणे

नीरेतील जीबीएस रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

CD

वाल्हे, ता. ५ : नीरा (ता. पुरंदर) येथील ५१ वर्षीय रुग्णाचा गिलियन-बारे सिंड्रोम (जी.बी.एस.) सदृश लक्षणांमुळे पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने गुरूवारी (ता. ५) मृत्यू झाला.
या रुग्णाला अशक्तपणा, हात-पायाला मुंग्या येणे आणि शरीरात शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसली होती ज्यामुळे त्याला नीरा येथील खासगी रुग्णालयातून पुण्यात हलविण्यात आले होते. या रुग्णाला उपचार सुरू असताना श्वसनासंबंधी समस्या वाढल्या होत्या. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवले गेले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.या घतनेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गुरुवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, गटविकास अधिकारी डॉ. प्रणोती श्रीश्रीमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम काळे यांनी नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित रुग्णाबाबत सविस्तर माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचनाही दिल्या. याप्रसंगी सरपंच तेजश्री काकडे, तालुका विस्तार अधिकारी प्रकाश चौरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश बागूल आदी उपस्थित होते.

नीरेत महा सर्वेक्षण मोहीम सुरू
या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नीरा परिसराची लोकसंख्या पाहता शुक्रवार (ता. ६) पासून महासर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून गावामध्ये सर्वेक्षण सुरू केला जाणारनाअहे. या आजाराबाबत नागरिकामध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम काळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई यांच्या हत्येनंतर भारताकडून शोक व्यक्त; इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेत स्वाक्षरी

Pune News : कमी दराच्या निविदांचा होणार बंदोबस्त; स्थायी समितीतील बैठकीमुळे ठेकेरादांचे धाबे दणाणले

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनचे शतक थोडक्यात हुकले, पण पठ्ठ्याने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले; अनेक विक्रम मोडले

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

SCROLL FOR NEXT