वाल्हे, ता. ९ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयात सोमवारी (ता. ९) रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत अटल अप टिमच्या वतीने अटल टिंकरिंग उपकरणांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन विषयक आवड निर्माण करणे आणि त्यांना प्रत्यक्ष प्रयोगांचा अनुभव देणे हे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य सतीश निगडे यांनी केले. याप्रसंगी सरपंच अतुल गायकवाड, पर्यवेक्षिका नाजमीन आत्तार, नवनाथ शिंदे, बयाजी धायगुडे, शैला गवारी, सोनाली पाटील, कीर्ती लंभाते यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.
सागर देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना अटल टिंकरिंग उपकरणांची माहिती देत त्यांचा वापर कसा करावा आणि त्यातून कोणकोणती कौशल्ये विकसित होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय सागर उदाळे, प्रियांशू मणियार आणि काकासाहेब पोळ यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे उपकरणांचा उपयोग करून दाखविला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
अटल टिंकरिंग कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम अनुभव ठरला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपकरणे वापरून केलेले प्रयोग पाहून त्यांच्या उत्साहाचे प्रमाण पाहणे आनंददायक होते. असे शैक्षणिक उपक्रम केवळ तांत्रिक कौशल्य वाढवतात, तर नवोन्मेषाची प्रेरणा देखील देतात. भविष्यातील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना आमचे विद्यालय सतत प्रोत्साहन देत राहील, असा विश्वास प्राचार्य सतीश निगडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी अटल टिमच्या वतीने अटल टिंकरिंगच्या संबंधित शिक्षकांना देखील मार्गदर्शन करण्यात आले. अटल टिंकरिंग लॅब प्रमुख अनिल दुर्गाडे यांनी प्रास्ताविक केले. सुदाम गायकवाड यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.