पुणे

अभिमान प्रभाग संघाच्या महिलांची सुकलवाडीत वार्षिक सर्वसाधारण सभा

CD

वाल्हे, ता. २४ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथे आज नीरा-कोळविहिरे गटातील अभिमान प्रभाग संघाच्या महिलांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. पुणे जिल्हा परिषद आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यातर्फे आयोजित या सभेत ग्रामीण महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन अभियान व्यवस्थापक नंदा कोरडे आणि तालुका व्यवस्थापक गणेश किकले यांच्या हस्ते करण्यात आले. गटाच्या वार्षिक कामकाज अहवालाच्या वाचनाने सभेची सुरुवात झाली. यावेळी गेल्या वर्षभरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच, आगामी वर्षातील योजना ठरवल्या गेल्या. या प्रसंगी प्रभाग समन्वयक मोहम्मद शेतसंधी, रमेश भंडलकर, सागर ढाकणे, प्रभाग संघाच्या अध्यक्षा संगिता जगताप, सचिव शितल पवार यांसह नीरा-कोळविहिरे गटातील महिला उपस्थित होत्या.
अभियान व्यवस्थापक कोरडे यांनी महिलांना स्थानिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. तालुका व्यवस्थापक किकले व महंत घाडगे यांनी महिला नेतृत्व, आर्थिक सक्षमीकरण आणि गटाच्या कामात संघटनात्मक सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामसखी सीमा शिंदे, सुजाता शिंदे, सुजाता पवार आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सुनिता भादेकर यांनी प्रास्ताविक केले. रूपाली पवार व जयश्री कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. तर, सरपंच संदेश पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : खरातप्रकरणी तपासामध्ये काही प्राण्यांचे अवयव मिळून आले- पीडितेचे वकील

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT