पुणे

सोमनाथ ताकवले यांना सुवर्णपदक जाहीर

CD

वाल्हे, ता. २४ : दौंडज (ता. पुरंदर) येथील रहिवासी व मावळ तालुक्याचे वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांना वन संवर्धन आणि वनसेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनाचे २०२३- २४ या वर्षाचे सुवर्णपदक जाहीर झाले आहे. महसूल व वन विभागाने त्यांच्या नावीन्यपूर्ण कार्याची दखल घेऊन ही निवड केली. ताकवले गेल्या २० वर्षांपासून वन विभागात कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यात त्यांनी म्हसवे येथे जैवविविधता उद्यान विकसित केले, ज्याबद्दल त्यांना ‘वनश्री’ पुरस्कार मिळाला आहे. सांगलीतील बसप्पवाडी येथे ५५ हजार झाडांची लागवड आणि बांबू लागवड योजनेत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. हवेली तालुक्यात कार्यरत असताना लोणी काळभोरमधील ३०० अतिक्रमणे त्यांनी हटवली. शिरोटा वनक्षेत्रात मानव- वन्यजीव संघर्ष रोखणे, मृदा संवर्धन आणि ‘लायन्स व टायगर पॉइंट’ या पर्यटन स्थळांच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या सर्वांगीण कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

07013

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

What is Gautam Adani Startup Initiative? फक्त मोठ्या शहरातच नाही, आता खेड्यापाड्यातील उद्योजकांनाही मिळणार अदानींचा पाठिंबा; काय आहे 'वंदे भारतम्' उपक्रम?

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला

आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

Bank News: 30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्र ने दिले मोठे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT